।। गणपति स्तोत्र ।।


     ।। गणपति स्तोत्र ।।


                             ॐ एकदंताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो  दन्ति प्रचोदयात् ।।

                      प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा ।

                     अज्ञान हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वर ।।

                     चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी ।

                      हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ।।

                 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

                   निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

   नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे ।     

   माथा शेंदूर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ।।

   माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे ।

गोसावी सुत वासुदेव कवि रे, त्या मोरयाला स्मरे ।।

   गणपति: विघ्नराजो लम्बतुन्ड़ो गजानन:।

    द्वै मातुरश्च हेरम्ब एकदंतो गणाधिप:॥

    विनायक: चारूकर्ण: पशुपालो भवात्मज:।

  द्वादश एतानि नामानि प्रात: उत्थाय य: पठेत्॥

विश्वम तस्य भवेद् वश्यम् न च विघ्नम् भवेत् क्वचित्।

विघ्नेश्वराय वरदाय शुभप्रियाय।

लम्बोदराय विकटाय गजाननाय॥

नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय।

गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं।

प्रसन्नवदनं ध्यायेतसर्वविघ्नोपशान्तये॥

 

 

॥ संकटनाशन गणेश स्तोत्र ॥

         श्री गणेशाय नमः नारद वाच

    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥

   प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
 तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

    लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
 सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।
                                     न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
                                     पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

 

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
 संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

    ॥ ईति श्री गणेश स्तोत्रम् संपूर्ण

                                                           

                            

                लोकमाण्य   टिळकां  पासून  प्रेरणा  घेऊन  श्री गणेश पूजनाला सार्वजनिक करूनही आम्ही सुखी न होता, दिवसेंदिवस भ्रामक सुखात अर्थात खड्ड्यातच जातो याचं मुख्य कारण हेच आहे की, तत्व सनातन असलं तरी व्यवहार व  आचार  यांची  घडण  कुठेतरी  चुकली,  बदलली.  समाजाच्या  सुख-शांती  व प्रगतीस पोषक अशी रचना त्यामध्ये राहिली नाही. आणि हाच गणेश पूजनामागील उद्देश आपण विसरून  गेलो.  समाज  संघटित करण्याची त्याला बलवान व बुद्धिमान करण्याची  क्षमता  निश्चितच  या  सामाजिक  उपक्रमात आहे. ईश्वर अत्र, तत्र-सर्वत्र आहे. तो चैतन्यशील व सतत कार्यरत आहे. तो  ज्ञानातीत आहे. अगदी खोल विचार केला तर असे दिसून येते की ज्याला आपण मी म्हणतो तो वस्तुतः  आपला  अहंकार  आहे  जीथे,  मी  नाही  तेथे  तो ईश्वर आहे. एका विशिष्ट आकाराला, मूर्तीला आपण गणपती म्हणतो. पण माती व रंग याशिवाय त्या मूर्तीत काय असते?  तसेच  ज्याला  आपण  “मी”  ही सज्ञा देतो तो देह म्हणजे पंचतत्वाचे एकीकरण. पृथ्वी, आप, तेज, वायू व  आकाश  यातून  सर्व  सृष्टीची  उभारणी.  यातूनच  आपला देह देखील आकाराला आला. पाचघटक मिळून तयार  झालेल्या देहाला विच्छेदित केले व एक-एक घटक वेगळा केला तर काहीच शिल्लक उरणार नाही. म्हणजे आपल्याला  जे  दिसते  किंवा भासते ते मुळात काहीच नसते. तर त्याची फक्त एक जाण असते. जाण अर्थात मानसिक  अथवा  भावनिक  स्तरावरची  असते.  याच  स्तरावरून  समग्र वैश्विक व्यवहार चालतात म्हणून कुठल्याही आकार व गुणांनी युक्त अशा वस्तूला नाव देण्यात येते. असे  प्राप्त  झालेले  नाव म्हणजे आपला देह. मातीला सोंडेसह देहाचा आकार  दिला  की  तो  गणपती  होतो.  त्याच  मातीला  गोलाकार दिला तर घट होतो. मुळात मातीच. जी काहीच नव्हे आणि काही असलीच तर “काहीच नाही पणाला” माती हे नाव मिळाले. ती माती.

        जेव्हा मातीतील (देहातील) मी पण जाईल तेव्हाच ती माती ईश्वर होईल. ती म्हणेल माझ्यामुळे घरे उभारली जातात, शेती पिकते. तर प्रेसंगी ते खरे वाटेल पण विचार करा ते सत्य आहे का? भिंत बनून उभे राहण्याचे सामर्थ्य मातीत नाही. पाण्याविना रोप अंकुरित करण्याची क्षमताही मातीत नाही. तेंव्हा हि त्या मातीची दर्पोक्ती म्हणजेच अहंकार. मी म्हणजे तो अहंकार. जिथे "मी" नाही तो ईश्वर. मी पण विसरलेल्या या मातीपासून बनलेल्या श्री गजाननाला दहा दिवस पूजायचं. एक प्रतीक समजून. त्याचे सर्व अवयव जसे मोठे कान जे बहुश्रुत व्हा असा बोध देतात. बारीक डोळे जे प्रत्येक वस्तू कडे सूक्ष्म नजरेने पाहाण्याचा संदेश देतात. प्रचंडडोके ज्या मध्ये भरपूर ज्ञान संग्रीहित होईल. तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असलेली सतत हलणारी लांबसोंड जिच्या बाबत डाव्या सोंडेचा गणपती सुख समृद्धीकारक आणि उजाव्या सोंडेचा गणपती विजयश्री व ऐश्वर्य दाता पण व्रताचरणास कठीन असतो असा समज आहे. उंदराला वाहन बनवून कालातीत झाला. कुठलीही वस्तू अन्न म्हाणून उपयोगी असो वा नसो. उंदीररुपी काळ कुरतडून तिला संपवणार पण त्त्या कळावर स्वार  झाले गणराय. सर्वकाही मोक्षाप्रत जाण्यासाठी प्रेरक असंच रूप आहे. त्या रूपात, त्याच्या पूजेत, दाह दिवस कसे जातात भक्तांना कळतहि नाही.

      शेवटी अनंतचतुर्थीला गणराय सांगतात, मूर्तीपूजेत सदैव गुंतून राहायचं नाही त्या निराकार अनंता पर्येंतचा आपल्या भक्तांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून मायामुक्त करून जीवशिवाची गाठ घालून देतात. शरीराला, मनाला व बुद्धीला बलदेणारी हि देवता आपली जीवने सात्विक व ध्येयनिष्ठ धृड निश्चयी व तेजस्वी करो.   

 


Comments