॥ श्रीकृष्णावतार ॥
।। एक श्लोकी भागवत ।।
आदौ देवकी देव गर्भजननं, गोपी गृहे वद्र्धनम्।
माया पूज निकासु ताप हरणं गौवद्र्धनोधरणम्।।
कंसच्छेदनं कौरवादिहननं, कुंतीसुपाजालनम्।
एतद् श्रीमद्भागवतम्
पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्।।
राजा शूरसेन यांचा मुलगा वासुदेव याचा विवाह मथुरेचा राजा उग्रसेन यांची मुलगी देवकी सोबत झाला. देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाली. वासुदेवाच्या सत्यवचनी स्वभावावर विश्वास असल्याने आठव्या आपत्यचे वचन घेऊन बंदीशाळेत टाकले. कंसाने सासरा मगधनरेश जरासंध, शिशुपाल व मंत्री चाणूर यांच्यासल्याने पिता उग्रसेन यांनाही बंदीशाळेत टाकले. कंसाने देवकीच्या सहा बाळांची हत्या केली. सातवा गर्भ वासुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात योगमाया द्वारे संकर्षण पद्धतीने स्थापित केला. तो शेष आवतारी बलराम कृष्णाचा अग्रज. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर यादवांचा नेता, पांडवांचा हितकर्ता, समस्त मानवाची उपास्य देवता, श्रीकृष्णाचा जन्म झाला. वासुदेवाने त्याला आपला मित्र नंद व यशोदा यांच्या स्वाधीन करून त्यांच्या मुलीला घेऊन आले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच कंस धावत आला. बाळाला हातात धरून गरगर फिरवताच ती हातून निसटली व पुन्हा आकाशवाणी झाली. “तुझ्या काळाने पृथ्वीवर जन्म घेतला आहे.!” कंसाने भीतीने बाल हत्येचे सत्र सुरू केले. काकासूर, बकासुर पूतना सारखे राक्षस गोकुळात पाठवले. कृष्णाने त्या सर्वांना खेळत-खेळतच संपवून टाकलं. श्रीकृष्ण खेळाचा भक्त होता. नंदबाबा कृष्णाला गुरूगृही ठेवण्यास नकार देतात तेव्हा अक्रूराला तो त्यांचा मुलगा नाही हे सांगावे लागते. कृष्ण खेळ मांडी तेंव्हा लहान-थोर सर्व विसरून, आसक्ती विरहित, सर्व गोप-गोपिका त्यात सहभागी होतं. राधा ही त्याची प्रेयसी व भक्त होती. कृष्ण व राधा म्हणजे प्रकृती आणि पुरुष. यादव सेनापती अक्रूर यास आमंत्रण देऊन कंसाने कृष्णाला मथुरेला बोलावले. कृष्णाने शिवधनुष्य तोडून आपणच कंसाचा काळ आहोत हे सिद्ध केलं. कृष्णाने कंस आणि त्याच्या दृष्ट मित्रांना संपवून राजा उग्रसेन यांना बंदी मुक्त केलं. याचे श्रेय देखील स्वतःकडे ठेवले नाही. गुरु सांदीपनीच्या आश्रमात त्यांना सुदामा सारखा मित्र भेटतो. आपले शत्रू आपल्याला संपवण्यास वारंवार गोकुळ वर हल्ला करतात म्हणून कृष्णाने स्थान बदल केला व कृष्ण द्वारकेला गेले. धर्माचरण करणार्या पांडवांना वेळोवेळी मदत केली. रणांगणात युद्धभूमीवर गीता सांगितली.
कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ हा उपदेश केला. श्रीकृष्ण
अर्जुनाला सखा म्हणतात. द्रौपदीला बहीण मानतात. पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञात
अग्रपूजेचा मानला मिळाला. श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील
कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा- सावळा"
आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. श्री कृष्ण हे पराक्रमी, मुष्टीयोद्धा, उत्कृष्ट सारथी, सखा, तत्त्वज्ञानी होते.
॥ श्री कृष्ण स्तुति ॥
Comments
Post a Comment
Note :- Please keep your comment span freely and respectful.