॥ परशुरामावतार ॥
पुढे मानवात अजून उत्क्रांती होत गेली.तो जीवनोपयोगी व जीवन राखण्यास आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला. परशुसाठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम.
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले
जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला)
झाला. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात
केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा
बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून
ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी
निघून गेले.
त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य
तोडणाऱ्या रामाला आव्हान
दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व
विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी
युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला. वडीलांचा
कोपिष्ट स्वभाव व स्वतःचे तेज यांना एकत्र करून आई व भावंडावरील संकट निवारले इतर
भावांनी पितृ अज्ञ पाळली नाही पण पर्सुरमाणे आई चे शीर धडा वेगळे केले व वडिलांनी
प्रसन्न होऊन इच्छित वर मागून घे म्हनताच आई व भावंडाना जीवात केले. माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर
आहे.
Comments
Post a Comment
Note :- Please keep your comment span freely and respectful.