॥ कूर्मावतार ॥

                      ॥ कूर्मावतार 



Second - Kurma Avatar - The Tortoise Incarnation

      प्रथम उद्भवलेल्या जलचर प्राण्यांतून उत्क्रांती होत-होत मग उभयचर प्राणी निर्माण झालेत. कूर्म हा एक उभयचर प्राणी आहे. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार. कासव पाण्यात व जमिनीवर राहतो. कासवाचे आयुष्यपण इतर प्राण्यांपेक्षा जास्तच असते. समुद्रमंथनाचे वेळी जेंव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे त्यास घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली. त्यामुळे मेरू पर्वत बुडू लागला. तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.

Comments