॥ रामावतार ॥

रामावतार

Vishnu's Ram Avatar | Vishnu, Lord vishnu wallpapers, Lord vishnu

           परशु हे शस्त्र असे आहे कि त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो. त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो. यासाठी स्वतःस सुरक्षित ठेऊन, दूरवर मारा करता येण्याजोगे शस्त्र धनुष्य  बाण वापरणारा हा राम.ही देखील पुढची उत्क्रांती. राम  कृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात कारण यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले. जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या. रामबाण हा प्रख्यात शब्द रामाच्या बाणावरुनच आला. अचूक वेध घेण्याचे कौशल्य असा याचा अर्थ होतो.श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. 
         श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होते. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर  त्यांनी आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात मर्यादापुरुषोत्तमअसे म्हटले जाते.

।। श्रीराम वंदना ।।

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योSस्महं ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुध्दर ।।

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥

 

           श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे व जनतेचे अधिष्ठान आहेत. राम सद्गुणांनी आणि सच्चरित्र्याने नराचा नारायण झालेला एक मानव. भगवंताचा पूर्ण अवतार आहे. वाल्मीकि रामायण सात खंडाचे आहे. यातील बालकाण्ड सांगते की मानवाने धनवान, ज्ञानवान असावे परंतु त्या पेक्ष्या महत्वाचे सहृदय असावे. बालकासमान शुद्धनिरागस, कपटरहित मन. वाणी व क्रिया यात समानता असावी.  उक्ती आणि कृती यात अंतर  नसावे. आतले बाहेरचे असा भेद नसावा. बालकासदृश्य मन-तन, आयोध्या म्हणजे बालकाण्ड. बाल्यावस्थेतील निष्कपटभाव स्थिर ठेवून पुढे जीवनाची वाटचाल करणे म्हणजे आयोध्याकांड. मानवाला जीवन लाभले आहे ते अल्प. या छोट्याश्या जीवन प्रवासात युद्ध नकोय्. कुणाबद्दल कु-भाव, वैर नको. आपल्या दुःख संकटासाठी अन्य कुणाला जबाबदार न धरता, द्वेषरहित जीवन जगणे म्हणजेच आयोध्याकांड गृहस्थ जीवनात विकार, वासना, बळावतात. गृहस्थाचे घर भोगभूमी असते. तेथे विकार-वासनांचे परमाणु फिरत असतात. ते मनाचा तोल सावरू शकत नाहीत. विलासी जीवनात संयमाला स्थान नसते. विरक्त जीवन जंगलात असते. साधे भोजन, वृक्षवल्लीची संगत सोबत, उद्यासाठी संचय न करण्यात करणाऱ्या पक्षांचे मधुर कुजन, परस्परांना सावरणारे विविध प्राणी! अरण्य म्हणजे निसंग जीवनाची दीक्षा देणारी पाठशाळा. सदैव  परिवारातच राहू नये. बाह्यजग जे आरण्यजीवन तेही काही दिवस अनुभवावे. सत्कर्म घडतील. वासना विनाश पावतील. हेच अरण्यकाण्ड सांगते.

            रामाची मैत्री करायची असेल तर “काम” त्यागून! जीव ईश्वर परस्परा सन्निध येतात. तेव्हा भक्तीमय जीवन परमोच्च आनंद प्राप्त करते. परंतु ईश्वरा सन्निध येताना जीवाला ब्रह्मचर्यासह शरण जावे लागते. हेच राम-सुग्रीव भेटीत घडले. सुग्रीव जीवात्मा आणि श्रीराम परमात्मा! सुग्रीवाला बल लाभले ते हनुमंताचे. हनुमंत ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याचे बल लाभल्यामुळे सुग्रीव श्रीरामाला भेटू शकला. किष्किंधाकाण्ड जीव परमात्मा भेट दर्शवते. सुंदरकांड हनुमंत कथा आहे. भक्तिमय जीवन- केवळ राममय जीवन- निस्वार्थ, सेवामय- परोपकारी जीवन हेच सुंदर जीवन! कामक्रोधादी षडरिपू घातक असतात. त्यांच्याशी युद्ध करून, त्यांचा विनाश करून विकार नष्ट करणे हेच भक्तिमय जीवन. भक्ती मध्ये अपार शक्ती आहे. विकार-वासनाशी लढण्यास हे युद्धकांड सांगतो. जो षड्रिपू निर्दालन करतो, संयमाने जगतो त्याचे उत्तर जीवन मंगलमय होते. मृत्यूचे भय उरत नाही. शांत, संयमी जीवनाची कामना उत्तराकाण्ड सुचवते. मानवी उत्क्रांतीत धार्मिक व्यक्ती ही किती व कशी निर्भय असावी हे राम अवताराने स्पष्ट केले.

Today's Almanac | Vedic Upasana Peeth

।। एक श्लोकी रामायण ।।

आदौ रामतपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्।

वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीवसम्भाषणम्॥

बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम्।

पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद्घि श्री रामायणम्॥

 

          किष्किंधा व लंका ही राज्य जिंकून रामाने आपले साम्राज्य वाढवले नाही. उलट ते दान करून तेथील लोकांची मने जिंकली. दुसऱ्याची वस्तू घेतल्याने त्यात प्रेम तर राहणारच नाही उलट वितुष्ट निर्माण होते. भीतीने, धाकाने चांगले वागण्या पेक्षा, सत्तेच्या धाका शिवाय, स्व-प्रेरणेने जो चांगले वागतो, स्वभावताः चांगला वागतो, सर्वात मिळून मिसळून राहतो, तो राम. धार्मिक व्यक्तीच्या वागण्यात भयाकुलता नसावी. तर सहजता असावी. तो निर्भय असतो. व्यक्तीच्या वर्तनातून शुद्धता, सात्विकता प्रगट झाली पाहिजे. लौकिक जीवनात जागृत राहिले पाहिजे. जगात सुसंवाद, संगती, सुस्थीती व्यवस्था असावी यासाठी आपल्याला शुद्ध सात्विकता अंगीकारली पाहिजे. ही सात्विकता आपल्या चारित्र्याने टिकवली पाहिजे. आपली पत्नी पवित्र आहे, ही जाणीव असूनही लोकांचा विश्वास संपादन करणे हे राजाचं पहिलं कर्तव्य समजून श्री रामाने सीतेचा त्याग केला. ते एक पत्नी निष्ठ होते. म्हणून सीतापती. आज जगात जो अनैतिक अत्याचार बोकाळला यावर सीतापती हा उत्तम पर्याय आहे.  प्रगती मार्गावर आपल्या निष्कलंक आचरणाने व्यक्तीधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म हे सांभाळले जाऊन राष्ट्रधर्म बलवान झाला पाहिजे. मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, शत्रूप्रेम, पत्नीप्रेम, राज्यप्रेम, जनप्रेम, गुरुप्रेम

          शिकावे ते रामाकडून. कुटुंबातील व्यक्ती कुटुंब पूरक असल्या तर कुटुंब समाज धारणेला उपयोगी होईल. गाव गावासाठी नव्हे तर राष्ट्रोपयोगी व्हावे. हा खरा धर्म राम अवतारात श्रीराम प्रभूंनी स्थापन केला.

          ग्रामीण भागात आजही दोन व्यक्ती समोरा समोर आल्या की परस्परांना दोन्ही हात जोडून राम राम म्हणतात यातून एक अर्थ असा निघतो की प्रत्येक व्यक्तीत राम वसलेला आहे कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्य व्यवस्थेसाठी रामराज्य हा शब्द पर्याय म्हणून वापरला जातो एखाद्या व्याधी समस्येवर किंवा संकटावर शेवटचा उपचार म्हणजे रामबाणउपाय कारण त्यांचा प्रत्येक कर्म हा जीवनातील प्रत्येक समस्येवर शेवटचा उपाय आहे

।। श्रीरामाष्टक ।।

हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा।

गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा॥

हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते।

बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्॥


© CopyRight AVB Stotra

Do Not Copy Secured Content 


Comments

  1. Hi Everyone I am Atharva Bedarkar And You Are Welcome To My Blog.
    Thanks For Visiting To My Blog.

    ReplyDelete

Post a Comment

Note :- Please keep your comment span freely and respectful.